गोंदिया नगरपरिषदेच्या सभापती भाजप आघाडीचे वर्चस्व

0
18
गोंदिया,दि.16-गोंदिया नगरपरिषदेच्या आज विषय समिती सभापतीपदाकरिता झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणीत आघाडीने वर्चस्व मिळविले.यात भाजपचे 4 तर आघाडीचा 1 सभापती निवडून आला.नगरपरिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विषय समिती सभापती निवडणुकीत बांधकाम सभापती पदी धर्मेश अग्रवाल(बेबी) यांनी लोकेश यादव यांचा पराभव केला.शिक्षण सभापती पदासाठी भाजपच्या मौसमी परिहार यांनी काँग्रेसच्या निर्मला मिश्रा यांचा पराभव केला.पाणी पुरवठा व स्वच्छता सभापती पदासाठी नितु बिरिया यांनी काँग्रेसच्या दिपिका रुसे यांचा पराभव केला.नगररचना विभाग सभापतीपदासाठी अपक्ष आघाडीचे सचिन शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विनित शहारे यांचा पराभव केला.महिला बालकल्याण सभापतीपदासाठी भाजपच्या वर्षा खरोले यांनी काँग्रेसच्या ज्योत्सना मेश्राम यांचा पराभव केला.स्थायी समिती सदस्य म्हणून भाजपचे घनश्याम पानतवने,काँग्रेसचे क्रांती जायस्वाल व आघाडीच्या नेहा नायक यांचे नामनिर्देशित करण्यात आले.विशेष म्हणजे या निवडणुकीदरम्यान अपक्ष आघाडीच्या एका गटाने नारेबाजी करीत निवडणुक प्रकिया रद्द करण्याची मागणी करीत काहीवेळ आंदोलन केले.तसेच प्रकियेचा विरोध करीत बसपच्या 5 सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला नाही.निवडणुकीदरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शहर परिवर्तन आघाडीच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून प्रवेश करीत शहिद जवांनाना श्रध्दाजंली वाहिली.