26.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ ‘शक्तीगड’ व्यायामशाळेचे उदघाटन

‘शक्तीगड’ व्यायामशाळेचे उदघाटन

0
27

गडचिरोली,दि.19ःः नक्षलवाद्यांविरोधात मोठी भूमिका पार पाडणार्‍या गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील सी-६0 जवानांकरीता अत्याधुनिक व्यायामाच्या उपकरणांनी सुसज्ज ‘शक्तीगड’ या व्यायामशाळेचे उद््घाटन आज १८ फेब्रुवारी रोजी सी-६0 कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. याप्रसंगी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक (नक्षल) डॉ. मोहीत गर्ग व पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.नक्षलविरोधी अभियान राबविणार्‍या सी-६0 जवानांना या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज व्यायामशाळेमुळे त्यांची शारिरीक सक्षमता वाढविण्यास नक्कीच फायदा होईल व जवानांचे मनोबल उंचावेल, असा आत्मविश्‍वास उद््घाटनाप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला.