शिवरायांचा आदर्श समाजाने आणि तरुणाईने बाळगावा.इंजि.सुनील तरोणे

0
19

गोंदिया,दि.19: कुडवा येथील मांग गारुडी समाजाच्या वस्तीत मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवाजी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे इंजिनियर सुनील तरोणे जिजाऊ ब्रिगेडच्या आरती चवारे, विश्वदीप बागडे, सविता बेदरकर तसेच यादव फरकुंडे उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी सर्व शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शिवरायांचा आदर्श या देशातील राज्यकत्र्यांनी ठेवला तर एक एकाही शेतकèयाची आत्महत्या होणार नाही स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन इथल्या तरुण आणि अमलात आणला तर या देशातली स्त्री अत्याचार मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही पण शिवरायाची जयंती साजरी करण्याबरोबरच शिवाजी महाराजांसारखा वागण्याची जबाबदारी समाज झटकतो म्हणून शिवरायांना अपेक्षित असलेला समाज घडू शकला नाही. अजय घराघरात शिवाजी जन्माला येऊ शकतो पण गरज आहे पहिल्यांदा जिजाऊ जन्मण्याची. शत्रूची का स्त्रिया सेना असेना तिचा पण आदर सन्मान केला पाहिजे अशी भूमिका शिवरायांची होती शिवाजी महाराज त्यांचं राज्य म्हणजे सर्व धर्म समभावाचे प्रतीक. सगळ्यांनी शिवरायांचा जयंतीच्या दिवशी त्यांच्यासारखं वागण्याची शपथ घेणे म्हणजे शिवरायांची जयंती साजरी करण्याचे औचित्य ठेवणे होय.
शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून मेडिकल कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी डॉक्टर सोनू आणि डॉक्टर आयुषी यांनी सगळ्या मुलांची स्त्री आणि पुरुषांचे आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचे संचालन विजय पात्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना पात्रे यांनी केले.