सडक अर्जुनी,दि.13ः- सर्व संत महापुरुषांनी देश सेवेसाठी तसेच समाजसेवेसाठी कार्य केले. या माध्यमातून समाजामध्ये एक चळवळ उभी झाली. सर्व संताचे कार्य हे प्रेरणादायक आहे. त्यातच संत शिरोमनी नरहरी महाराजांचे कार्य वाखाण्याजोगे आहे, असे प्रतिपादन मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. सौंदड येथे संत सिरोमनी नरहरी महाराज यांच्या जंयती कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलते होते. यावेळी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुठहे, सुरेश हर्षे, डॉ. प्रकाश येवले, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, पं.स.सदस्य मजुताई डोंगरवार, उषा हर्षे, केशव येवले, तेजराम चुटे व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.




