३९ हजार युवा मतदार प्रथमच करणार मतदान

0
19

गोंदिया,दि.१६ : निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून यात आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजावून या उत्सवाचे भागीदार होण्यासाठी प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उत्साह आहे. वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १७ लाख ९१ हजार मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी ३९ हजार ८३२ युवा मतदार प्रथमच या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजाविणार असून मतदानाला घेवून त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
निवडणूक व मतदान प्रक्रियेला घेवून हळूहळू नागरिकांमध्ये जनजागृती वाढत आहे. त्यामुळेच एकूण मतदारांच्या आकडेवारीत मागील दहा वर्षांच्या तुलनेत वाढ होत असल्याचे चित्र आहे. २००९ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहीमेत १० हजार तर २०१४ मध्ये १७ हजार मतदारांची वाढ झाली होती. तर यंदा प्रथमच ३९ हजार ३२ मतदारांची वाढ झाली आहे. दिव्यांग सुध्दा निवडणूक व मतदान करण्याबाबत जागृत होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात एकूण २ हजार ९१३ दिव्यांग मतदार आहेत. यात गोंदिया विधानसभा क्षेत्रात ६६५, अर्जुनी ८४३, तिरोडा ४५२ व देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात ९५३ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर व्हिलचेअर, स्ट्रेचरची तसेच दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध करु दिली जाणार आहे. तसेच मतदानाच्या प्रक्रियेची माहिती दिव्यांगांना समजावी यासाठी त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
येत्या ११ एप्रिलाला होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आदिवासी व दुर्गम देवरी तालुक्यातील विद्यार्थ्यांशी मंगळवारी (दि.१२) संवाद साधला. तसेच किती विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली, किती जणांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे, मतदान प्रक्रियेबाबत किती विद्यार्थ्यांना माहिती आहे, याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून घेतली. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागातर्फेनवीन मतदार नोंदणीसाठी १ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर दरम्यान मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यात ३३ हजार ७२८ मतदार वाढले. २३ ते २४ फेब्रुवारी दरम्यान राबविलेल्या मोहीमेत ३ हजार ९२५ आणि २ ते ३ मार्च दरम्यान २ हजार १४९ मतदार वाढले. यात फार्म क्रमांक ६ भरुन मतदार नोंदणी करणाºया युवा मतदारांची संख्या अधिक होती