बिरसी विमानप्राधिकरणाच्यावतीने पाच गावात लागणार एलईडी बल्ब

0
17

गोंदिया,दि.22 : भारतीय विमानपत्तन प्राधिकरण बिरसी विमानतळावर २० लाख रुपयाच्या खर्चीत निधीतून बिरसी विमानतळाच्या नजिकच्या ग्राम खातिया, कामठा, बिरसी, परसवाडा, झिलीमिली या पाच गावात असलेल्या विजेच्या खांबांवर एलईडी बल्ब एका उपक्रमातंर्गत लावण्यात येणार आहे. बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी या गावातील जमिनी अधिग्रहीत करण्यात आली आहे. यासह या गावात सी. एस. आर. अंतर्गत विविध कामे भारतीय विमान प्राधिकरण बिरसी विमानतळाच्या वतीने करण्यात येत आहे. यात २० लाख रुपये खर्चून एल.ई.डी बल्ब प्रत्येक विजेच्या खांबावर लावण्यात येणार आहे. यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना विजेच्या खांबावर लावण्यात येणाऱ्या बल्बच्या खर्चात कपात होणार आहे, तसेच एलईडी बल्ब लावल्याने विजेची बचतही होईल. भारतीय विमानपत्तन बिरसी विमानतळाद्वारे ज्या कंत्राटदाराला बल्ब लावण्याचे काम दिले गेले तोच कंत्राटदार पाच वर्षापर्यंत त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्याची जबाबदारी सांभाळणार आहे. जर कोणत्याही कारणाने बल्ब नादुरुस्त झाले अथवा फिटींग व्यवस्थीत झाली नसेल तर संबंधित कंत्राटदारच त्याला दुरुस्त करणार आहे. भा. वि. प्रा. बिरसी विमानतळाच्या या अभिनव उपक्रमाने गोंदिया तालुक्यातंर्गत येणारे ग्राम खातिया, कामठा, बिरसी, परसवाडा व झिलीमिली हे पाच गावे एलईडीच्या प्रकाशाने झगमगणार आहे