33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ डाॅ.विजया नांदुरकर(ठाकरे)बसपच्या उमेदवार

डाॅ.विजया नांदुरकर(ठाकरे)बसपच्या उमेदवार

0
58

blank

भंडारा/गोंदिया,दि.24ःःभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाने यावेळी महिला उमेदवार रिगंणात उतरविले असून पवनी येथील डाॅ.विजया राजेश नांदुरकर(ठाकरे) यांना उमेदवारी जाहिर केली आहे.डाॅ.विजया नांदुरकर यांनी गेल्या दोन वर्षापुर्वी झालेल्या पवनी नगरपरिषदेच्या निवडणुक रिंगणातही नगराध्यक्ष पदासाठी बसपकडून निवडणुक लढविली होती.त्यांचा सामाजिक कार्यात मोठे योगदान दिसून येत आहे.फुले शाहू आंबेडकरी विचांराचा पगडा असलेल्या ड़ाॅ.विजया या ओबीसी समाजाच्या जनजागृतीत नेहमी पुढे राहतात.डाॅ.विजया यांचे माहेरचे आडनाव ठाकरे असून सासरचे आडनाव नांदुरकर आहे.त्यांचे पती राजेश नांदुरकर हे बहुजन समाज पक्ष भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.बसपने पहिल्यांदा ओबीसी महिलेला रिंगणात उतरविले आहे.