मुलुंड येथे मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्सव साजरा

0
60

मुलुंड,दि.24ः- मावळा प्रतिष्ठान तर्फे मुलुंड पूर्व येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात दुर्गाडी किल्ल्यावरून शिवज्योत मुलुंड येथे आणण्यात आली. शिवव्याख्याते अजिंक्य नाईक यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा समाज’ या विषयावर तडफदार व्याख्यान दिले. गजरुद्र ढोल पथकाद्वारे छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. पोवाडा, पाळणा, इत्यादी सादर करण्यात आले. अरुण अय्यर यांच्या संयोजनाने ऐतिहासिक नाणी, ऐतिहासिक पत्र, मोडी लिपी ओळख व त्याच्या लेखनाची साधने यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. शालेय विद्यार्थांसाठी शिवरायांवरील प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम घेण्यात आला व यामधील विजेत्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले. हिंदू महासभेचे सदस्य अरुण माळी यांच्या तर्फे पूर्ण वंदे मातरम आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला बहुसंख्येने शिवप्रेमी जनता उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव, सरचिटणीस रमाकांत बने, खजिनदार महेंद्र जाधव, मुंबई जिल्हा अध्यक्ष मयुरेश शिंदे, रायगड जिल्हा अध्यक्ष अस्मित महाडिक, पालघर जिल्हा अध्यक्ष शशांक तांडेल, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय दुधाणे यांच्या नेतृत्वाखाली बबन ननावरे, सागर बोडके, रोहित सोनटक्के, सर्वेश परब, प्रतिक चवरे, शुभम वाजे, रोशन खानविलकर, दर्शना शेलार, प्रीती सोलाट, कविता शिंदे, उज्वला जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.

शिवप्रेरणा मित्र मंडळातर्फे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम

मुलुंड येथील शिवप्रेरणा मित्र मंडळातर्फे शिवजयंती निमित्त मोफत शरीर तपासणी शिबिर आयोजिण्यात आले होते. ह्या शिबिराला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला. मुलुंड जिमखानाचे अध्यक्ष चेतन साळवी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. जेष्ठ नागरिक  सुहास मसूरकर यांच्या हस्ते याठिकाणी सार्वजनिक वाचनालयाचे उद्धाटन करण्यात आले. तसेच जेष्ठ शिवसैनिक अशोक परब ह्यांच्या हस्ते सूचना फलकाचे उद्धाटन करण्यात आले.ह्यावेळी शिवप्रेरणा मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश बनबे, उपाध्यक्ष मयूर दाभोळकर, प्रविण खरात, दिनेश सावंत, आनंद पुनगुडे, वसंत पवार, साहेबराव घोलप, अशोक परब, श्रीकांत पवार, किरण गमरे, श्याम अनावकर, मंगेश म्हात्रे, पराड, मसूरकर, शहा व इतर अनेक जेष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.या संपूर्ण कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

भांडूप कलाकार कट्टा तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

शिवजयंती निमित्त भांडुप कलाकार कट्टा तर्फे ‘जागर शिवशक्तीचा सोहळा गौरवशाली ईतिहासाचा’ हा कार्यक्रम शिवाजी तलाव येथे आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमात ‘भांडुप विकास मंच’ चे कलाकार विश्राम चव्हाण, पौर्णिमा पोळ, राजेश आयरे, तुषार केळूसकर, सुहास बागवे, निखिल चव्हाण, अतुल गुरव, संतोष हातकर ह्यांनी आपल्या अभिनयाने मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ह्या कार्यक्रमाचे लेखन नीलम काशीद व प्रथमेश राणे यांनी केले तर दिग्दर्शन नीलेश गुंडाळे यांनी केले.