भाजप नेते डाॅ.बोपचेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

0
24

भंडारा/गोंदिया,दि.25ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या येत्या 11 एप्रिल रोजी होऊ निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष, माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपमध्ये खळबळ माजली आहे.त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आपण लढण्यास इच्छुक असून पक्षानेच आपल्याला तयारी करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आपण अर्ज दाखल केला आहे.सोबतच राज्यात व देशपातळीवर ओबीसींच्या समस्या व मागण्याना घेऊन काम करीत असून ओबीसींचा आवाज संसदेत मांडण्यासाठी आपण गेले पाहिजे याकरीता उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले.त्यांच्या या पावित्र्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यामध्ये खळबळ माजली असून त्यांना शांत करण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या आहेत.ते पक्षाचे आदेश मानतात की उमेदवारी अर्ज कायम ठेवतात याकडे लक्ष लागले आहे.डाॅ.बोपचे यांनी जर आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला तर दोन्ही पक्षांना काहीप्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.