गडचिरोली-चिमूर क्षेत्रात १० जणांचे १८ अर्ज तर भंडारा-गोंदियासाठी 34 उमेदवारांचे 52 अर्ज सादर

0
12

गोंदिया/गडचिरोली,दि.२५:  भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता आज सोमवारला शेवटच्या दिवशी 28 उमेदवारांनी 45 नामांकन अर्ज दाखल केले.आतापर्यंत एकूण 34 उमेदवारांनी 52 अर्ज भरले आहेत. तर गडचिरोली-चिमूर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून आज ६ जणांनी ११ नामनिर्देशनपत्रे सादर केली. १८ मार्चपासून आतापर्यंत १० जणांनी १८ अर्ज सादर केले आहेत.

भंडारा-गोंदिया लाेकसभा मतदारसंघात भाजपकडून सुनिल मेंढे,राष्ट्रवादी काँग्रेस नाना पंचबुध्दे,अपक्ष माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,बसपकडून डाॅ.विजया नांदूरकर,किसान गर्जेनेचे राजेंद्र पटले आदींनी उमेदवारी अर्ज सादर केले.तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात डॉ.नामदेव उसेंडी(भाराकाँ), देवराव नन्नावरे(आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), डॉ.रमेशकुमार गजबे(वंचित बहुजन आघाडी), अशोक नेते(भाजप), डॉ.नामदेव किरसान(अपक्ष), दामोधर नेवारे(अपक्ष), सुवर्णा वरखडे(गोंगपा), हरीश मंगाम(बसपा), दिवाकर पेंदाम(बहुजन मुक्ती पार्टी) व पवन मगरे(बसपा) यांनी अर्ज सादर केले आहेत. अर्जांची छाननी २६ मार्चला, तर अर्ज मागे घेण्याची तारीख २८ मार्च ही आहे.