भिवर्गीत१० एकरावरील ऊस जळून खाक

0
39

विज तारांचा ठिणग्या पडून लागली आग ;१० लाखाचे नुकसान

(राजेभक्षर जमादार)संख,दि.25ः जत तालुक्यातील भिवर्गी तलावा नजिकच्या दहा एकरावरील ऊस विजेच्या ठिणग्या उडून आग जळून खाक झाल्याची घटना शनिवारला घडली.त्यात सुमारे १० लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.भिवर्गी तलावानजिक मादाना अण्णाप्पा पुजारी यांचा ४ एकर ,पंडीत अमंणा पुजारी ४ एकर ,महासिध्द अमगोंड खंटे २ अशा तिन शेतकऱ्यांच्या लगत असणाऱ्या विज वितरण कंपनीच्या टिसीमधुन ठिणग्या पडून ऊसाला आग लागली.बघता बघता १० एकरवरील ऊस जळून ऱाखा झाला.ऊसाला पाणी देण्यासाठी टाकलेली मोटारीची केबल ठिबक सिंचनाच्या व इतर पाईप्स ,लगतची फळझाडे ,कडबा असे आदी आगीत जळून खाक झाले. त्यात सुमारे १० लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.संध्याकाळ पर्यत चोफेर लागलेली आग विज विझवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता.घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ठरल्याप्रमाणे महसूल विभागाकडून उशीर झाला.दरम्यान ऐन दुष्काळात पोटाला पिळ देऊन जगविलेला ऊस डोळ्यादेखत जळून गेल्याने शेतकरी मौठ्या अडचणीत आले. आहेत महावितण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.