दिव्यांग मतदारासाठी ९६ व्हिलचेअरची व्यवस्था-जमईवार

0
15

अर्जुनी मोर,दि.29 : सन २0१८-१९ या वित्तीय वर्षात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपले स्तरावर अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या पाच टक्के राखीव निधीतून दिव्यांगासाठी इतर अनुदेय असलेल्या बाबीसोबतच सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २0१९ लक्षात घेता दिव्यांगांना मतदान केंद्रावर मतदान करणे सुलभ व सोयीस्कर तसेच अडथडा विरहित होण्यासाठी तालुक्यातील ७0 ग्रामपंचायतीमध्ये ९६ व्हिलचेअर व ९६ मॅग्नीफॉईंग ग्लासची व्यवस्था करण्यात आल्याची माहीती गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमाईवार यांनी दिली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी गोंदिया यांचे सुचनेनुसार माहे एप्रिल ते मे २0१९ मधे लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहे. या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र सुस्थितीत व अद्ययावत असने आवश्यक आहे. रॅम्प ची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, पुरेसे फर्नीचरची व्यवस्था करणे, विद्युत व्यवस्था करने, दिशादर्शक फलक लावणे, प्रसाधन गृहाची व्यवस्था करणे, उन-पाऊस पासून सरंक्षणाची व्यवस्था करणे, मतदान केंद्राचे क्षेत्रफळ २0 चौ.मी.आहे काय, मतदान केंद्रास दोन दार व खिडक्या आहेत काय, एका इमारतीत जास्तीत-जास्त किती मतदान केंद्र आहेत, मतदान केंद्र तळमजल्यावर आहे काय, स्री-पुरुष यांची वेगळ्या रांगेची व्यवस्था आहे काय, दरवर्षी डि.पी.सी.च्या निधीतून शाळा दुरुस्ती करिता निधी उपलब्ध करून दिला जाते. तसेच ग्रामपंचायतीकडे १४ व्या वित्त आयोगाचा निधी आणी शाळा व्यवस्थापन समितीकडे लहान कामे दुरुस्ती करिता निधी उपलब्ध असतो. सदर निधीतून ही कामे सहजपणे करता येते. जेणेकरून शाळेच्या भौतिक पायाभूत सुविधांमधे सुध्दा वाढ होते.दिव्यांगासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवून दिव्यांगासाठी पुर्णपणे खर्च करायचा आहे, अशी माहितीही गटविकासाधिकारी नारायणप्रसाद जमाईवार यांनी दिली.