प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल ३० मार्चला भंडारा जिल्ह्यात

0
42

भंडारा,दि.29 : काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांचा ३० मार्च रोजी भंडारा तालुक्यात दौरा आयोजित आहे. खासदार प्रफुल्ल पटेल शनिवारी सकाळी ११ वाजता लाखांदूर तालुक्यातील भागडी, १२ वाजता विरली खुर्द त्यानंतर पवनी तालुक्यातील पौना येथे दुपारी १.३० वाजता, दुपारी २ वाजता मांगली बाजार, दुपारी ३ वाजता आसगाव, दुपारी ४.३० वाजता कोंढा कोसरा, सायंकाळी ६ वाजता चिचाळ, सायंकाळी ७.१५ वाजता पवनी येथील गांधी चौकात सभा घेणार आहे तर रात्री ८.३० वाजता पवनी तालुक्यातील भुयार येथे सभा घेतील.