बसचालक-वाहकांची विद्यार्थ्यांसह प्रवाशांसी असभ्य वर्तणुक

0
15

गोंदिया,दि.30ः-गोंदिया राज्य परिवहन महामंडळाच्या  आगारातून सुटणार्या बसमधून देवरी-सालेकसा सारख्या मागास भागातील खेड्यात दररोज बसने प्रवास करणार्या नोकरदार वर्गासह विद्यार्थी व प्रवाशांशी बसमधील वाहक व चालक असभ्य वर्तणक करीत असल्याची तक्रार तसेच बसमध्ये जागा असतांनाही विद्यार्थ्यांना बसवित नसल्याची तक्रार सामाजिक बांधिलकीच्या रुपात शिक्षक सहकार संघटनेच्यावतीने गोंदिया आगारप्रमुखांकडे करण्यात आली आहे.

या निवेदनात शिक्षक सहकार संघटनेने  दररोज आम्हाला बस ने प्रवास करण्याचा प्रसंग येतो.त्यादरम्यान शाळकरी विध्यार्थी ,विद्यार्थिनी आणि नोकरदार वर्ग व प्रवाशी एस.टी.ने प्रवास करीत असतांना काही चालक व वाहक बसमध्ये जागा असून सुद्धा विध्यार्थ्यांसाठी बस थांबवित नसल्याचे तसेच विद्यार्थी व प्रवाशी यांच्याशी असभ्य वागणूक करीत अरेरावीची भाषा वापरत असल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक एस.टी.मधील काही वाहक चालक यांच्या वागणुकीमुळे  बालमन दुखावत चालले असून विद्यार्थ्यांचा मानसिक व भावनिक छळ होत असल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक प्रगतीवर होत असल्याचे नमुद केले आहे.निवेदन देतेवेळी रवी अंबुले (विभागीय अध्यक्ष ) सुरेंद्र गौतम (जिल्हाध्यक्ष ) प्रमोद शहरे ( कार्याध्यक्ष ) कैलास चौधरी (संघटक ) विजय लिल्हारे ( प्रसिद्धीप्रमुख ) उपस्थित होते .