आचारसंहिता काळात २५९ आरोपींवर गुन्हे दाखल

0
11

गोंदिया,दि.30 : लोकसभा निवडणुकाकरिता १0 मार्चपासून लागू झालेल्या आचारसंहिता काळात २८ मार्चपयर्ंत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाई मोहिम राबवून २४५ कारवायांमध्ये २५९ आरोपींवर गुन्हे दाखल करुन ४0 लाख २२ हजार ७३१ रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.
याअंतर्गत २४४ अवैध दारू व्यावसायिकांवर छापे टाकून २५६ आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केले असून त्यांच्याकडून २ लाख ८५ हजार ६५४ रुपयांची हातभट्टीची दारु, १ लाख ४ हजार ४0९ रुपयाची देशी दारु, ६ लाख १२ हजार १२५ रुपयाचा मोहापास, ३८ हजार ९७४ रुपयांची विदेश दारू तसेच १७ लाख ४९ हजार १९0 रुपयांचे इतर साहित्य जप्त केले. तसेच एनडीपीएस कायद्यान्वये १ कारवाईत ३ आरोपींकडून ११ लाख १६ हजार ५00 रुपये किमतीचा १0३ किलो गांजा व १ शेलरोवेट कार जप्त करण्यात आली आहे. सोबतच जिल्ह्यात ७ ठिकाणी नेमलेल्या आंतरजिल्हा व आंतरराज्यीय चेकपोस्टवर आतापयर्ंत ४ हजार ९0१ वाहने तपासण्यात आली असून २६३ वाहनांवर मोटारवाहन कायद्यान्वये कारवाईकरण्यात आली आहे. तसेच स्थानिक पोलिस ठाणे जिल्हा वाहतूक शाखा, शहर वाहतूक शाखेतर्फे अचानक वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.