24.7 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ नक्षल्यांनी केले लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन

नक्षल्यांनी केले लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन

0
35

गडचिरोली,दि.५: लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना नक्षल्यांनी जिल्ह्याच्या पूर्वोतर भागात बॅनर लावून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.येत्या ११ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरु केली आहे. परंतु दुर्गम भागात नक्षल्यांनी बॅनर लावून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. कोरची तालुक्यातील मसेली, धानोरा तालुक्यातील देवसूर व भामरागड तालुक्यातील काही गावांलगत असे बॅनर आढळून आले आहेत. या बॅनरवर नक्षल्यांनी भाजपवर टीका केली असून, भाजप हा लोकविरोधी तसेच, दलित, आदिवासी, मुस्लिम व महिलांवर अन्याय करणारा पक्ष असल्याने या पक्षास हद्दपार करा, असे आवाहन नक्षल्यांनी केले आहे.