सत्तेवर येताच शेतकर्यांसाठी स्वंतत्र अर्थसंकल्प देणार-राहुल गांधी

0
12

चंद्रपूर,दि.05 -गेल्या पाच वर्षापुर्वी आपल्याला अच्छे दिन चे गाजर आणि 15 लाख रुपये बँक खात्यात देण्याचे आमिष देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्वसामान्य गरीब शेतकरी,शेतमजुरांची फसवणूक केली आहे.परंतु आम्ही सत्तेवर येताच 72 हजार वर्षाला देणार तर 3 वर्षात 3 लाखाच्यावर आपल्या बँक खात्यात देणार आहोत.त्यामुळे कुठलीही अर्थव्यवस्थाही बिघडणार नाही.सोबतच आम्ही शेतकर्यांसाठी सत्तेवर येताच स्वतंत्र अर्थसंकल्प सुरु करुन शेतकरी विकास साधणार आहोत असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.चंद्रपूर येथील सभेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळू धानोरकर व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डाॅ.नामदेव उसेंडी यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.त्या सभेला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,केंद्रीय पर्यवेक्षक दुवा,आमदार विजय वड्डेटीवार,सुभाष धोटे यांच्यासह काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस रिपाईचे नेते व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना गांधी म्हणाले की, मोदींच्या 15 लाखाच्या घोषणेमुळे अर्थव्यवस्थाच बिघडणार होती,त्यामुळेच ते पैसे देऊ शकत नव्हते.बेरोजगारांना रोजगार दिला नाही परंतु गरिबांच्या घरासमोर कधी चौकीदार पाहिला का? मोदींनी फक्त श्रीमंत लोकांची चौकीदारी केली, असा घणाघात चंद्रपुरात राहुल गांधींनी मोदींवर केला. २०१४ मध्ये मला चौकीदार करा म्हणणाऱ्या मोदींनी पाच वर्षे देशातील श्रीमंताची चौकीदारी केली. अंबानी, अदानींनी देशाल लुटले आणि देशाचा पंतप्रधान त्यांची चौकीदारी करत होते.

राहुल गांधी पुढे म्हणाले की एकीकडे सर्जीकल स्ट्राईक होत असताना दुसरीकडे देशातील 5 विमानतळ अनिल अंबानीना विकून टाकले.मोदी उद्योगपतींचे कर्ज माफ करतात,शेतकर्यांचे नाही.येथील सरकारने दिलेली कर्जमाफी अद्यापही पुर्ण झालेली नाही.पण आम्ही शेतकर्यांसाठी सत्तेवर येताच स्वतंत्र अर्थसंकल्प सुरु करुन शेतकरी विकास साधणार आहोत.न्याय योजनेच्या माध्यमातून 72 हजार व 22 लाख नोकर्या देणार असे म्हणाले.नोटबंदी व जीएसटीवरही त्यांनी सरकारवर घणाघाती केला.