24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची सोमवारला जाहीर सभा

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची सोमवारला जाहीर सभा

0
25
अर्जुनी मोरगाव,दि.07  :  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांची जाहीर सभा ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. ते हेलीकॉप्टर ने येणार आहेत.या सभेला पालकमंत्री राजकुमार बडोले, महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे, गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार डॉ परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, माजी खासदार खुशाल बोपचे, शिवसेना गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, रिपाई(आ) चे जिल्हाप्रमुख तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या वेळी केंद्रीय मंत्री गडकरी आपल्या प्रखर मार्गदर्शनातून जनतेला संबोधित करतील.सभेला जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा, शिवसेना व रिपाई (आ) तर्फे करण्यात आले आहे.