25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार धानोरकरांच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड

चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार धानोरकरांच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड

0
28

चंद्रपूर,दि.10ः-लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्याकरीता उद्या गुरुवारला मतदान होणार असतानाच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर आज आयकर विभागाने धाड टाकून कारवाई सुरु केली आहे.यापुर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी यांच्याघरासह इतर ठिकाणीही धाड घालण्यात आली होती.सरकार एैन निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्याच नेत्यांच्या घरावर व त्यांच्याशी संबधित लोकांच्या घरावर धाड घालत असल्याने कुठेतरी द्वेषपुर्ण भूमिका असल्याची चर्चा मतदारात सुरु झाली आहे.सरकार आयकर विभागाच्याम माध्यमातून मतदारासोबत काँग्रेस नेत्यांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा सुर उमटू लागला आहे.