36.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ आगीत महालगाव येथील चार आरामशीन खाक

आगीत महालगाव येथील चार आरामशीन खाक

0
28

नागपूर,दि.13ः-भंडारा रोड महालगाव परिसरातील सहा आरा मशीनला शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने चार आरा मशीनीती लाकूड व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली.अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी दुपारपर्यंत येथे धगधग सुरूच होती. यामुळे येथे एकच गोंधळ उडाला होता.
महापालिका क्षेत्राबाहेर भंडारा रोड महालगाव परिसरात आरा मशीन (सॉ मिल) आहेत. येथील सहा आरा मशीन असलेल्या परिसरात पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. येथील कापलेले व अन्य लाकूड पडून असल्याने आगीने अचानक भडका घेतला व लोळ आकाशात निघू लागले. ही आग आजूबाजूच्या परिसरात पसरते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. या घटनेची अग्निशमन दलास सकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे १० बंब व २५-३० जवान लगेच घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. येथे सहा आरा मशीनला आग लागली असून चार आरा मशीनवरील जवळपास ९० टक्के मालमत्तेचे नुकसान झाल्याचे अग्निशमन विभागाच्या सूत्रानुसार समजते. येथे जीवितहानी झालेली नाही.