एकस्तर वेतनश्रेणीनुसार वेतन निश्चिती करा

0
23

गोंदिया,दि.०५: नक्षलग्रस्त जिल्ह्यात कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाच्यावतीने सातत्याने अन्याय होत असून सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. याकरिता सातव्या वेतन आयोगाची एकस्तर पदोन्नतीनुसार वेतन निश्चिती करुन देयके मंजूर करण्यात यावे या संबंधीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी महसूल कर्मचारी संघटनेचे जिलाध्यक्ष राजेश मेमन, कार्याध्यक्ष राकेश डोंगरे, सचिव आशिष रामटेके, महेश काचलवार, अतुल कडू, विठठल राठोड, पवन बिसेन, चैताली मानकर, सोनाली भोयर आदि उपस्थित होते.