खा.पटेलांनी घेतली शहीद जवानांच्या कुटुबांची सांत्वना भेट

0
13

भंडारा,दि.०६ः- गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळखेडा येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या नक्षल्यांच्या भुसुरुंगस्पोटात शहीद झालेल्या भंडारा जिल्ह्यातील ३ शहीद जवानांच्या कुटुंबाची राष्ट्रवादीचे नेते व खासदार प्रफुल पटेल यांनी सांत्वना भेट घेत सर्व देश आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.तसेच खा.पटेल यांनी या घटनेचा त्रीव निषेध नोंदवित सरकारने नक्षल्यांच्या त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी केली.खा.पटेल यांनी दिघोरी येथील शहीद जवान दयांनद शहारे,कुंभली येथील नितीन घोरमारे व लाखनी येथील वालोदे यांच्या घरी जाऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली.यावेळी त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे,माजी आमदार राजेंद्र जैन,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,धनजंय दलाल,अविनाश ब्राम्हणकर,बाळु चुन्ने आदी मान्यवर उपस्थित होते.