25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

भंडारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

0
24

भंडारा,दि.१३ : जिल्हा परिषद पोट निवडणुकीचे भारतीय जनता पक्ष २९- पालांदुर जिल्हा परिषद क्षेत्राचे अधिकृत उमेदवार रंजनाताई नंदागवळी, सरपंच पदाचे उमेदवार केशवजी कुंभरे, ४३- ब्रम्ही जिल्हा परिषद क्षेत्राचे द्रोपद धारगावे यांच्या प्रचाराची सुरवात करण्यासाठी स्थानिक तथागत गौतम बुद्ध व श्री. हनुमान मंदिर येथे पूजा अर्चना करून पोटनिवडणुक संदर्भाच्या नुक्कड सभेला उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार  सुनिलजी मेंढे, भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा नगराध्यक्ष इंजि. प्रदीपजी पडोळे, उपाध्यक्ष डॉ. प्रकाशजी बाळबुद्धे,  प्रशांत खोब्रागडे, भाजपा महिला मोर्चा आघाडीचे माधुरीताई नखाते, मंडल अध्यक्ष पद्माकर बावनकर, सुरेंद्र आयतुलवार, माजी नगराध्यक्ष मोहन सुरकर, श्री. डोंगरवार, तूंरांजी भुसारी, किशोर पंचभाई सह क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते