गडचिरोली जिल्हयात योग दिनाचे उत्साहात आयोजन

0
13
????????????????????????????????????

गडचिरोली,दि. २१:- आंतरराष्ट्रीय योग दिन आज दि. २१ जुन २०१९ रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्हयात अतिशय शिस्तबध्द व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. जिल्हा मुख्यालयी आयोजित कार्यक्रमात अति.जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, पुरवठा अधिकारी महेश पाटील, ,
जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रदीप शिंदे , भूजन कळमकर, स्काऊट व गाईड चे प्रतिनिधी , जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू, तसेच कॉम्प्लेक्स परिसरातील नागरीक उपस्थित होते.
सुरुवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आल्यावर जिल्हयात जिल्हा क्रीडा कार्यालयाने कळविल्याप्रमाणे ७००० ग्रामस्थांनी सहभाग घेतला.गडचिरोली जिल्हयात मुख्यालयापासुन तर तालुक्यापर्यंतचे नियोजन चंद्रदीप शिंदे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनात मदन टापरे, क्रीडा अधिकारी यांनी काटेकोरपणे नियोजन करुन हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी अतिशय मेहनत घेऊन मोलाचे कार्य केले.