नविन मतदार नोंदणीसाठी युवा मोर्चाने सज्ज व्हावे : विक्रांत पाटील

0
13
गोंदिया,दि.24 : राज्यात होणाºया आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नविन मतदार नोंदणीकरीता भारतीय जनता युवा मोर्चा वर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण राज्यात सीएम चषक ही क्रीडा स्पर्धा भाजयुमोने यशस्वीपणे पार पाडली. त्याचप्रमाणे कठीण परिश्रम घेवून नवमतदार करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केले.
भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत  २३ जून रोजी अग्रसेन भवन येथे आयोजित भाजयुमोच्या विस्तारीत जिल्हा बैठकीत बोलत होते. यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, नगरसेवक दिनेश दादरीवाल, ललित मानकर, नगरसेवक विवेक मिश्रा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हितेश डोंगरे, रूपेश कुथे,  भाजयुमो शहर अध्यक्ष नेत्रदिप गावंडे, गौरी पारधी, अनंत ठाकरे, ओम कटरे, दुर्गाप्रसाद ठाकरे, शितल तिवडे, नीरज सोनवाने, पारस पुरोहित,  विनोद चांदवानी, राजेश बिसेन, पुष्पराज जनबंधू, किशोर दुबे, ओमप्रकाश हरीणखेडे, मिलिंद बागडे  आदि उपस्थित होते.
अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी आपल्या मार्गदर्शनातून संपूर्ण जिल्ह्याचा युवा मोर्चाच्या कार्यक्रमाची माहिती देत सीएम चषकाच्या माध्यमातून मोठ्या संख्येत युवकांना जोडून त्यांच्यातील खेळाडू वृत्ती वाढीसाठी प्रयत्न केले. यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पात भाजयुमो जिल्ह्यात 10 हजार वृक्ष लागवड करणार असल्याचे सांगितले. नवमतदार नोंदणीसाठी संपूर्ण युवामोर्चा सज्ज असल्याने त्यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी युवा मोर्चाच्या कार्यक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. तर दिनेश दादरीवाल यांनी रोजगार व स्वयंरोजगार या विषयावर युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अनुराग शुक्ला तर आभार प्रदर्शनजिल्हा महामंत्री ऋषीकांत साहू यांनी केले. कार्यक्रमात भाजयुमोचे तालुकाध्यक्ष, महामंत्री, जिल्हा व तालुका कार्यकारीणीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.