मोहाडी,दि.26ः- तालुक्यातील सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे राहते घर प्रशासनाने पाडल्याच्या निषेधार्थ तसेच त्यांना जमिनीचा पट्टा देण्यात यावे व दोषी अधिकाèयावर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी,शेतमजुर आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात मोहाडी तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी शनिवारपर्यंत मागण्यां निकाली लावण्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत शिवलाल लिल्हारे यांच्या मुलांचे उपोषण सुरुच राहणार आहे.जवळील सिरसोली येथीलशिवलाल लिल्हारे यांचे घर सरपंच व तहसीलदार यांनी संगनमत करून राजकीय द्वेषापायी पाडले होते. हे प्रकरण जिल्हयात सध्या फार गाजत आहे. त्यांची दोन अल्पवयीन मुले पंधरा दिवसांपासून उपोषणावर बसलेली आहेत. त्यामुळे जनतेत रोष आहे.
मोर्चा तहसिल कचेरीत पोचल्यानंतर माजी खासदार नानाभाऊ पटोले,माजी खासदार मधुकर कुकडे, राजू कारेमोरे, पंकज कारेमोरे,रमेश पारधी, आशिष पातरे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रभारी उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून लिल्हारे यांना २९ जूनपर्यंत पट्टा देण्याचे प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन दिले. मात्र आंदोलनकर्ते नागरिक आजच निकाल दया, या मागणीवर ठाम होते. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण नानाभाऊ पटोले यांनी आंदोलनकर्ते नागरिकांची समजून घालून शनिवारपर्यंत वाट बघण्याचा सल्ला दिला. मोर्चात अंदाजे पाच हजार नागरिक उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चात माजी खासदार मधुकर कुकडे, राजू कारेमोरे, नरेश डहारे, धनंजय दलाल, रमेश पारधी, प्रमोद तितीरमारे, महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, अनिल काळे, अरविंद येळणे, नरेश ईश्वरकर, किरण अतकारी, राजेश हटवार, के. के. पंचबुद्धे, सुनील गिरेपुंजे, नाना पंचबुद्धे, अमर रगडे, प्रभू मोहतुरे, रिता हलमारे, मनीषा गायधने, मोहाडीच्या नगराध्यक्षा गीता बोकडे, शोभा बुरडे, कविता बावणे, वंदना मेश्राम, कमलेश कनोजे इत्यादी नेते उपस्थित होते.





