कार्यकर्त्यांचे भावनिक प्रेम हीच आपल्या प्रामाणिकतेची पावती – माजी मंत्री बडोले

0
14

अर्जुनी-मोर,दि.02ः-भारतीय जनता पाटीर्ने आपल्याला खुप काही दिले आहे. अजुर्नी मोर विधानसभा क्षेत्रात एक कुटुंबप्रणाली निर्माण झाली आहे. गावागावातील शेवटच्या कार्यकत्र्यांशी आपली नाळ जुळली आहे हेच आपले मोठे यश आहे. विधानसभा क्षेत्रातील लोकांचे प्रेम व आत्मविश्‍वास पाहून आपण भारावून गेलो असून कार्यकर्त्याचे भावनिक प्रेम हेच आपल्या प्रामाणिकपणाची पावती असल्याचे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी केले.
मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने २९ जून रोजी सडक अजुर्नी येथे आपल्या निवासस्थानी आल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या भावनिक व कौटुंबिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सडक अजुर्नी तालुकाध्यक्ष विजय बिसेन, अजुर्नी-मोर तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, गोरेगाव तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, सभापती अरविंद शिवणकर, माजी आ. भेरसिंग नागपुरे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, लक्ष्मीकांत धानगाये, गिरधारी हत्तीमारे, प्रकाश गहाणे, विधानसभा क्षेत्रातील सर्व महामंत्री, जिप व पंस सदस्य, बाजार समितीचे सभापती, पेजप्रमुख व बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. बडोले यांच आगमन होताच कार्यकत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विधानसभा निवडणुका काही महिन्यात होत असताना बडोले यांच्यावर कुठलेही दोषारोपन नसताना त्यांचे मंत्रीपद जाणे हे सर्व कार्यकत्र्यांना जड गेले आहे. अनेक कार्यकत्र्यांना आपल्या भावना व्यक्त करताना अर्शु अनावर झाले होते. यावेळी जनतेच्या भावना लक्षात घेता ना. बडोले हे देखील भारावून गेले होते. ते म्हणाले, २0१४ पासून आपल्याला कॅबिनेट मंत्री, पालकमंत्र्याची जबाबदारी पक्षाने दिली होती ती आपण यशस्वीरित्या पार पाडली. गत साडेचार वर्षात महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला प्रेम दिले आहे. मात्र, माज्या विधानसभा क्षेत्रातील लोकांचे प्रेम व आत्मविश्‍वास पाहून भारावून गेलो आहे. आपण समाजातील सर्वच घटकांतील लोकांचा विश्‍वास संपादित करुन प्रामाणिक विकास केला आहे. आता आपल्याला जोमाने पक्ष कार्य व जनतेच्या अडचणी सोडवायच्या असून अशीच साथ व सहकार्य यापुढेही राहील अशी अपेक्षा असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन लायकराम भेंडारकर यांनी केले.