धरतीचे ऋण फेडण्यासाठी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभागी व्हा : ना.डॉ.परिणय फुके

0
11

भंडारा दि. 6 जुलै :- द.म. रेल्वे नागपूर व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रेल्वे मैदान, म्हाडा कॉलोनी जवळ, खात रोड भंडारा येथे आज वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा ना.डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.द.म.रेल्वे नागपूर व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने भंडारा येथे 15 हजार वृक्ष लागवट करण्यात येणार आहेयावेळी खासदार सुनील मेंढे, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता अरविंद विश्वकर्मा, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, न.प. उपाध्यक्ष आशु गोंडाने, नगरसेविका जयश्री बोरकर, आर. एम. विधाते, हरीश कुमार महेंद्र व प्रकाश बाळबुधे उपस्थित होते.