अभियांत्रिकीच्या व्दितीय वर्षाच्या प्रवेशात आधीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश द्या- एन.एस.यु.आय

0
15

गोंदिया,दि.06ः-तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाच्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांवर अन्याय करीत व्दितीय वर्षाचा सरळ प्रवेशाचा कोटा कमी केल्याच्या विरोधात काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेने आज दि.6 रोजी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. डी. गोड़घाते यांची भेट घेत निवेदन सादर केले.त्या निवेदनात अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाचा कमी झालेला कोटा पूर्वरत करण्याची मागणी करण्यात आली.केंद्र सरकारने ही मागणी मान्य न केल्यास एन.एस. यु.आयाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन केले जाईल असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र प्रदेश NSUI उपाध्यक्ष संदीप रहांगडाले यांनी दिला.निवेदन देतेवेऴी जिल्हा उपाध्यक्ष रोहन रंगारी,महासचिव सुमित महावत,कार्तिक भेलावे,अभिजीत रघुवंशी,चेरिस खांडेकर,अवि नागपुरे,गौरव चंनेकर,रोहित वैद्य, विशाल बिसेन,राहुल बघेले, शिवम चमकेलव NSUI चे कार्यकर्ता उपस्तिथ होते.