जागतिक लोकसंख्या दिवस कार्यक्रम उत्साहात

0
12

गोंदिया,दि.11ः- जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने आज “जागतिक लोकसंख्या दिन” कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती रमेश अंबुले यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या.यावेळी मंचावर महिला व बालकल्याण सभापती लताताई दोनोडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलेजा सोनवाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे,जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.हिम्मत मेश्राम यांच्यासह इतर वैद्यकिय अधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी बोलतांना आरोग्या सभापती रमेश अंबुले यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्याचे काम जर देशात कुणी करीत असेल तो फक्त आपला आरोग्य विभाग करतो.अशा क्षेत्रात काम करत असतांना मोलाची कामगिरी व आपले कार्य उत्कृष्टरित्या पार पडणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार होणे सोबतच त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलाने करण्यात आले.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग,जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.