कटंगी येथे क्रांतीवर नारायण सिंह ऊईके जयंती साजरी

0
19

गोंदिया ,दि.११: नजिकच्या कटंगी येथील गोंडीनगरच्या क्रांतीवीर नारायणसिंह ऊईके चौकात आज (दि.११) क्रांतीवीर नारायण सिंह ऊईके  जयंती साजरी  करण्यात आली.  कार्यक्रमाला  गुलाबसिंग कोडापे, सह गोकुल बोपचे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गोपाल सिंह ऊईके, माजी उपसभापती दामोदर नेवारे, ब्रिजलाल मरकाम, लक्ष्मनसिंह ऊईके, सुरेश कुंभरे, प्रकाश फुन्ने, ग्रा.पं.सदस्य शेखर कोहळे, विमला ऊईके, पाटील, झाडे, बनोठे, भावना कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी  गुलाब सिंह कोडापे गुरूजी यांनी क्रांती सिंह नारायण सिंह ऊईके यांचा जन्म कटंगी गोंदियाचा असला तरी सुर वीर मंदा मावा गोंडवाना , तिरकमठा मावा बाणा, असे म्हणत लोकांनी प्रति व्यक्ती १ रूपया देणगी  देवून सन १९५२ मध्ये प्रदेश विधान सभेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणूकीत पुराडा हेटी कुरखेडा विधानसभा क्षेत्रातून अपक्ष आमदार म्हणून निवडुन आणले होते. लोकोत्तर कार्याला वाहिलेले क्रांतीवीर नारायण सिंह ऊईके यांनी विदर्भातील जबराण जोत चळवळ राबवून ठलव्या असलेल्या हजारो गोर गरीब लोकांना मालकी हक्काचे शेत जमिनीचे  पट्टे  मिळवून दिले. एवढेच नव्हे तर निस्तार हक्क, स्वतंत्र गोंडवाना राज्य, आदिवासी क्षेत्र बंधन हटाव मोहीम, व्यापार्‍यांचे प्रश्न असे एक ना अनेक प्रश्नासाठी शेवट पर्यंत लढले. ते तिनदा आमदार म्हणून निवडून आले. ही कटंगीवासीयासाठी आणि आदिवासीसाठी  अभिमानाची बाब आहे, असे कोडापे गुरूजींनी मार्गदशश्रनातून व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतीवीर नारायण सिंह ऊईके संघर्ष समिती, राणी दुर्गावती मडावी सेवा समिती, आदिवासी गोवारी संघर्ष समिती गोंडवाना, दि.बिलाईत आदिवासी सह.पत संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी कटंगी परिसरातील नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.