29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा खासदार मेंढेनी घेतला आढावा

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा खासदार मेंढेनी घेतला आढावा

0
28

नवी दिल्ली,दि.12जुर्लेः-भंडारा -गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी (११ जुलै) दिल्ली येथे कृषी मंत्रालयातील अधिकारी सुधीर शर्मा यांच्यासोबत बैठक घेऊन भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मतदारसंघातील काही शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत त्या तातडीने दूर करण्याचे सुचना देखील मेंढे यांनी दिल्या.
बैठकीतील चर्चेनुसार स्थानिक सहकारी बँकांचे IFSC code हे Nationalised Bank शी जूडले असल्यामुळे  पैसे सरळ शेतकर्‍यांच्या खात्यात जाण्यात अडचण होत असल्याचे समोर आले आहे.ही तांत्रिक अडचण तातडीने दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्याचे मेंढे यांनी सांगितले.याप्रसंगी भाजपचे दिपक कदम, उमा हारोडे, सुनिल पालांदूरकर  उपस्थित होते.