डेंग्यू प्रतिरोध महिना जनजागरण अभियान एक दिवस एक कार्यक्रम

0
38

गोंदिया,दि.: १2 : राष्ट्रीय किटकजन्य आजार प्रतिबंध कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयाद्वारे डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच डेंग्यू प्रतिरोध महिना मोहिमेंतर्गत ‘एक दिवस एक कार्यक्रमङ्क याप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची डेंग्यू प्रतिरोध जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये मनोहर मुन्सीपल हायस्कूल व हायर सेकंडरी हायस्कूल या दोन्ही शाळेतील शिक्षक, शिक्षीका व विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवून डेंग्यू या आजाराला शहरातून हद्दपार करण्याची शपथ घेतली.
रॅलीचे उद्घाटन बीजीडब्लू रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षीका डॉ.सुवर्णा हुबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना जलजन्य व किटकजन्य आजाराबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळायचा म्हणजे घरातील पाण्याची सर्व भांडी घासून पुसून कोरडे करुन ठेवायचे. ड्रम, कुलर, पाण्याच्या टाक्या, रांजन, माठ, फुलदान्यातील साचलेले पाणी, रिकामे पडलेले टायर, नारळाच्या करवंट्या यासारख्या टाकावू वस्तूमध्ये पाणी साचू दयायचे नाही, जेणेकरुन डासाची उत्पत्ती होणार नाही. तसेच ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी अशी लक्षणे दिसून आल्यास आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका किंवा सरकारी दवाखान्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी न.प.हायस्कूल व ज्यूनियर कॉलेजचे प्राचार्य एन.बी.बिसेन, एन.सी.सी.कमांडर आर.एस.धाबर्डे, किशोर तावाडे, श्री.कपासे, बी.एस.मेंढे तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचारी श्री.चट्टे, के.एन.डोंगरे,आशिष बले, पंकज गजभिये, श्री.बैसवारे, श्री.बिसेन, श्री.राठोड, डी.बी.शेंडे व श्री.पाटनकर यांनी सहकार्य केले.

१५ जुलैला महिला लोकशाही दिन
गोंदिया : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तीक समस्या, गाऱ्हाणी व अडीअडचणी ऐकून घेण्यासाठी १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनामध्ये सर्व महिला कर्मचारी, महिला मंडळ, बचतगट व इतर महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था येथील महिला थेट सभेमध्ये येवून वैयक्तीक तक्रार नोंदवू शकतात. अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, खोली क्र.३६, जयस्तंभ चौक, सिव्हील लाईन, गोंदिया या कार्यालयात नि:शुल्क प्राप्त होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गोदिया येथे संपर्क साधावा.

उद्योजकांनी जून-२०१९ अखेरचे ईआर-१ विवरणपत्र ऑनलाईन सादर करावे
गोंदिया : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयामार्फत गोंदिया जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व आस्थापना व खाजगी क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, उद्योजकता यांनी जून-२०१९ अखेरचे तिमाही विवरणपत्र ईआर-१ महास्वयंम ुुु.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप या वेबपोर्टलवर भरण्यात यावे. तसेच आस्थापना व उद्योजकांनी सदर वेबसाईटवर एम्लायर लॉगीनमध्ये १५ अंकी क्रमांक व पासवर्ड लॉगीन करुन ईआर-१ विवरणपत्र ऑनलाईन सादर करावे. ईआर-१ तिमाही विवरणपत्र सादर करणे बंधनकारक असून विवरणपत्र सादर न करणाऱ्या आस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद सेवायोजन कार्यालय कायदा १९५९ मधील कलम ७(२) मध्ये करण्यात आलेली आहे. ईआर-१ विवरणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१९ पर्यंत आहे. असे सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गोंदिया यांनी कळविले आहे.