गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपारला डेमु सुरु करा-खा.नेते

0
29

गोंदिया,दि.१२ः-चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या आमगाव,सालेकसा तालुक्यातील नागरिकांना प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी गोंदिया ते डोंगरगड(दुर्ग) ही नवी डेमू गाडी दुपारी १२ ते ४ वाजेच्या मध्ये सुरु करण्यात यावी अशी मागणी चिमूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेच्या काळात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली.यावेळेत डेमू ट्रेन सुरु करण्यासाठी नागिरक व प्रवाशानी अनेकदा आंदोलन केली,निवेदने सुध्दा दिली परंतु अद्याप त्याकडे लक्ष दिलेले नाही तरी लवकरात लवकर ही ट्रेन सुरु करुन डोंगरगडला जाणाèया भाविकांसाठी सुविधा द्यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी सोबतच सालेकसा तालुक्यातील धानोलीला सालेकसा रेल्वेस्टेशन अंतर्गंत रेल्वेच्या जागेतून जाणाèया धानोली-बाम्हणी ११९० मीटर लाबींच्या रस्त्यासाठी रेल्वेने ती जागा महसुल विभागाकडे हस्तातंरित केल्यास २५ किलोमीटरच्या फेèयाने जावे लागणारे अंतर कमी होणार असाही मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थी,विद्यार्थीनी व नागरिकाना सालेकसाला येण्यासाठी २५ किमीचा फेरा घालून यावे लागत असल्याने सदर जागेची हस्तांतरण महसुल विभागाला करण्यात यावे अशी मागणी केली.