आमदार रहांगडालेंच्या हस्ते घोटीत विविध कामाचे भूमिपूजन

0
13

गोरेगाव,दि.१६ : तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी घोटी येथे सभा घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आ. रहांगडाले यांच्या हस्ते विकास कामाचे भूमीपूजन व वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आले.
आमदार विजय रहांगडाले हे प्रत्येक शनिवारी गोरेगाव कार्यालयात भेट देऊन जनतेच्या समस्या मार्गी लावण्याचे काम करत असताना क्षेत्रात भाजपाच्या सदस्य संख्या वाढीसाठी प्रयत्नरत आहेत. अशात शनिवारी आ. रहांगडाले यांनी जवळच्या घोटी येथील नागरिकांची सभा घेऊन त्यांच्या समस्या जाणून मार्गदर्शन केले. घोटी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सरपंच पायउतार प्रकरणानंतर भाजपच्या प्रभारी सरपंच म्हणून संगीता कटरे यांना पदभार देण्यात आला.जीप समाज व बाल कल्याण सभापती विश्वजित डोंगरे यांनी अनु.जाती व नवबौद्ध घटकांचा विकास अंर्तगत १६ लाखांचा निधी मंजूर करून प्रस्तावित कामांचे भूमीपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पस व क्रुऊबास सभापती लक्ष्मीकांत बारेवार, जीप सभापती विश्वजित डोंगरे, गोरेगावचे नपं अध्यक्ष आशिष बारेवार, भाजपा कोशाध्यक्ष ईश्वरलाल सोनवणे, माजी पंस सभापती दिलीप चौधरी, उपसभापती बबलू बिसेन, सरपंच संगीता कटरे व ग्राप सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नवीन तलावात जनसुवीधा योजने अंर्तगत बनिंर्ग सेट व हातपंपाचे काम, जयपाल मेश्राम ते बारजाबाई बळगे व भाऊदास टेंभुर्णीकर ते चंपाबाई डोंगरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम, तसेच प्रभुदास डोंगरे ते बुधराम डोंगरे यांच्या घरापयंर्त रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.