25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

0
31

नवेगावबांध दि.१६ : जिल्हा परिषद क्षेत्रअंतर्गत बाक्टी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ समोरील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन १५ जुलै रोजी जिप सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बाक्टीचे सरपंच भानुदास वडगाय, उपसरपंच गुलशन सांगोडे, पशुधन पर्यवेक्षक डॉ.विकास बडोले, ग्रापं सदस्य हातेस शहारे, केशव हेमणे, प्रमिला राजगिरे, प्रतिभा प्रधान, जयमाला बोरकर, सुभाष फरदे, यामिनी सांगोळे, ललिता चाचेरे, देवेंद्र हगकर, रविंद्र खोटेले आदी उपस्थित होते