भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शिंदे

0
7
वाशिम,दि.20- भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक संतोष शिंदे यांची नियुक्ती केली आहे.देशभरातील ईतर मागासवर्गीय समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून कार्य करीत आहे. महाराष्ट्रात देखील सदर मोर्चाचे मजबूत संघटन आहे. आगामी काळात ओबीसींच्या हितासाठी या मोर्चाला अधिक बळकट बनविण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. वाशिम जिल्हा देखील याला अपवाद नाही. त्याच पृष्ठभूमीवर जिल्ह्यात ओबीसी मोर्चाची बांधणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी या मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी नगरसेवक संतोष शिंदे यांच्याकडे सोपविली आहे. संघटन बांधणीचा मोठा अनुभव शिंदे यांच्या गाठीशी असून त्यांच्याकडे युवा कार्येकर्त्यांची फौज आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात ओबीसी मोर्चाला अधिक बळकटी मिळणार यात शंका नाही. जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र स्विकारताना संघटन सरचिटणीस धनंजय रणखांब, संदीप पिंपरकर  जिल्हा परिषदेचे गट नेते शाम बढे, कोषाध्यक्ष मिठूलाल शर्मा, मिडिया प्रमुख नागेश घोपे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल तुपसांडे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद गोरे, नगरसेवक रूपेश वाघमारे, गजानन खटके, स्वप्नील खडसे, निरज देशमुख, सागर नगरकर आदींची उपस्थिती होती.