अर्जुनी मोर तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा-तालुका काँग्रेसचे निवेदन

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.२३ः- अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडल्याने दुबार पेरणीची वेळ आलेली आहे.त्यामुळे तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषीत करण्याच्या मागणीचे निवेदन अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेसच्यावतीने तहसिलदारामार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.निवेदनात अर्जुनी मोरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करावा,दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात यावे,प्रती एकर २५ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे.सरसकट कर्ज माफ करावे,कृषी विजपंपाचे बिल माफ करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष भागवत पाटील नाकाडे,रत्नदिप दहिवले,शिला पटले,चंद्रशेखर ठवरे,राजू पालीवाल,गिरिश पालीवाल,संतोष नरुले,नितिन भालेराव,रामप्रसाद सुरपान,डॉ.देवाजी कापगते,अनिता नाईक,युवराज झोडे,लिलाधर ताराम,टिकाराम डोंगरवार,सुरेंद्र ठवरे,वंदना जांभुळकर,वंदना सहारे,रqवद्र खोटेले,संजय नाकाडे आqदचा समावेश होता.