क्रांतीवीर नारायणसिंह ऊईके स्मृती दिन कार्यक्रम आज

0
14

सडक अर्जुनी,दि.२६ : गोंडवानातील क्रांतीवीर आदिवासींचे लोकेनेते माजी आमदार नारायणसिंह ऊईके यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आज (दि.२६) दुपारी १२ वाजता त्रिवेणी लॉन शेंडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.वामनराव शेडमाके राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रमेश कोरचा, नंदकुमार नेताम, भरतबापू मडावी तर प्रमुख अतिथी म्हणून गुलाबसिंह कोडापे, जगदिश मडावी, गोपालसिंह ऊईके, तेजराम मडावी, कारूजी फरदे, ब्रिजलाल मरकाम्, लक्ष्मणसिंह ऊईके, सुभाष न्यहामुर्ते आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन अ.भा.नारायणसिंह ऊईके संघर्ष समिती शाखा सडक अर्जुनीच्या वतीने करण्यात आले आहे.