तलावांवर पाणघाट बांधण्याची महिलांची मागणी

0
18

सडक अर्जुनी,दि.25: गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु जिल्ह्यात अनेक गावातील महिलांना तलावात जीव मुठीत घेऊन कपडे धुवावे लागतात. सडक अर्जुनी तालुक्यात बोपाबोडी, सौंदड, कोसमतोंडी, हेटी, गिरोला, मूरपार, लेंडेझरी, मुंडीपार, चिचटोला अशा अनेक गावांना लागून असलेल्या तलावामध्ये पाणघाट नाही. पाणघाट नसल्याने महिलांना आपला जीव मुठीत घेऊन कपडे धुवावे लागतात. यामुळे तलावावर घाट बांधण्याची मागणी महिलांनी केली आहे.अनेक तलावाच्या पाळीला लावलेले पिचिंगचे दगड महिला काढून त्या दगडाचा वापर कपडे धुण्यासाठी करतात. यामुळे अनेक तलावातील पिचिंगचे दगड पाळीच्या आतील बाजूला पडलेले दिसतात. या दगडाचा वापर महिला कपडे धुण्यासाठी करतात. तालुक्यात जि.प. लघु पाटबंधारे विभाग, गोंदिया व लघु पाटबंधारे स्थानिकस्तरतर्फे तलाव व बोड्यांच्या कामावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. गावालगत असलेल्या तलावात मोठमोठे पाणघाट दरवर्षी बनवून जेवढा खर्च माती टाकण्यासाठी येतो तेवढाच खर्च पाणघाट व रपटे बनविण्यासाठी केला जातो. परंतु रपट्यांवरून तलावाचे पाणी जात नाही व पाणघाटाच्या पायऱ्या पाण्यात बुडत नाही, असे सडक अर्जुनी तालुक्यातील पाणघाट व रपट्यांचे चित्र आहे.वास्तविक पाणघाट बांधताना शासनाने गावाला लागून अर्धा कि.मी.वर असलेल्या तलाव व बोडीवर पाणघाट बांधायला पाहिजे. परंतु अशा ठिकाणी पाणघाट बांधले जात नाही. शासनाने महिलांना प्रत्येक ठिकाणी ५० टक्के आरक्षण दिले आहे. शासनाने तसेच स्थानिक स्तरावर महिलांसाठी प्रत्येक गावात प्रथमच गाव तिथे पाणघाट ही योजना राबविण्यात येते. ज्याप्रमाणे समाजमंदिर बांधण्यासाठी निधी दिला जातो त्याप्रमाणे पाणघाट बांधण्यासाठी प्रयत्न केला तर महिलांचा कपडे धुण्याचा प्रश्न मिटेल..