दिव्यांगानी मतदार यादीत नाव नोंदवावे – डॉ.कादंबरी बलकवडे

0
44

सुलभ निवडणुका जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची बैठक संपन्न
गोंदिया दि.२२ : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता भारत निवडणुक आयोगाने दिव्यांग मतदारांना लोकशाही प्रकियेमध्ये सामावून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदार यादीत नव्या दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ करण्याच्या अनुषंगाने सुलभ निवडणूका जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठीत करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली २१ ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक संपन्न झाली.
दिव्यांग व्यक्तिही समाजाचा अविभाज्य घटक असून समाजातील प्रत्येक घटकात त्यांचे समायोजन व्हावे म्हणुन निवडणूक प्रक्रियेत त्यांचा महत्वाचा सहभाग नोंदविण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी विधानसभा स्तरावर मतदारसंघनिहाय बैठक घेण्याचे निर्देश दिले. दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी वयाचे १८ वर्ष पुर्ण करणारी व्यक्ति मतदार म्हणून मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करण्यासाठी मतदान केन्द्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसिल कार्यालयात संपर्क करु शकतील. मागील लोकसभा निवडणूकीमध्ये मतदार यादीत तीन हजार १०० दिव्यांग मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. भारतीय निवडणुक आयोगाने ‘सुलभ निवडणूकाङ्क(अललशीीळलश्रश एश्रशलींळेप) हे घोष वाक्य जाहिर केले आहे. त्यानुसार दिव्यांग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यक्रमात दिव्यांग मतदारांना निवडणुक प्रक्रियेबाबत तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधेबाबत माहिती देण्यात येईल. तसेच येत्या ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मतदारयादी प्रसिद्धी करण्यात येईल.
२१ प्रकारच्या दिव्यांगत्व असलेल्या नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीत दिव्यांग म्हणून नोंदवावे जेणे करुन निवडणुक आयोगामार्फत व मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या विशेष सुविधांचे लाभ दिव्यांग मतदार यांना घेता येईल. तसेच इतर नागरीकांनी दिव्यांग नव मतदारांना ज्यांनी १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्ष पुर्ण केली आहे त्यांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी केले आहे.

दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधाःः.

• मतदान प्रकियेशी संबंधित कायदे, नियमासाठी https://eci.gov.in
• मतदारयादीत नाव व मतदान केन्द्र शोधण्यासाठी
https://ceo.maharashtra.gov.in
• ऑनलाईन मतदार नोंदणी/दुरुस्ती/नाव वगळणे इत्यादीसाठी https://www.nvsp.gov.in
• तक्रारी साठी https://eci-citizenservices.eci.nic.in
• PWD ॲप द्वारे मदतीची मांगणी करता येईल. सदर ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.
• अंध मतदार आपले मत देण्यासाठी फॉर्म 49 अ भरुन आपल्यासाठी साथीदाराची मदत घेऊ शकतात.