आष्टी येथील स्मशानभूमीपरिसरात वृक्षारोपण

0
26

नागपूर,दि.22ः- स्वातंत्रदिनाचे निमित्त साधत उद्धार फाउंडेशन व आष्टी ग्रामस्थ, तरुण यांच्या सहयोगाने गट ग्रा. प. घोटमुंढरी अंतर्गत मौजा आष्टी येथील स्मशानभूमी लगतच्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.आज पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त वृक्षारोपण करणे हे महत्वाचे नसून लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे, संरक्षण करणे व त्यांना जगवणे महत्वपूर्ण आहे. व हेच खरे वृक्षारोपण आहे. जर आपण पर्यावरण वाचवले तरचं शेतकरी वाचेल म्हणून आज पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज आहे. ‘चला तर झाडे लावू या, झाडे जगवू या.. निसर्ग समतोल राखुया..!’ उद्धार फाउंडेशन च्यावतीने वनराई सौंदर्यिकरण व निसर्गबेट उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गाचे संगोपन करणे हे ध्येय ठेवण्यात आले आहे.2500 झाडे लावण्याचे लक्ष्य असून 650 वृक्ष लागवड ग्रा. प. सेवक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. कार्यक्रमाला सहभागी उद्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राम वाडीभष्मे आष्टी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. रमेशजी रावते, सुरेंद्रजी वाडीभष्मे माजी ग्रा. प. सदस्य, संयजजी रावते, तरुण मंडळी अमोल रावते, मिलिंद रावते, इम्रान शेख, अमोल घरडे, सारंग हरोडे, अश्विन वाडीभष्मे, शिवकुमार देवतारे, तुषार शेंडे, रोहित पटले, अर्जुन घुघुसकार व इत्यादींनी सहभाग नोंदवला.