गोंदिया,दि.२६ : भारतीय किसान संघाच्या वतीने शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी २६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ दिवसीय आंदोलन होणार आहे. शेतकर्यांना स्वामीनाथन आयोगाच्या सिफारशीनुसार आधारभूत मुल्य देण्यात यावे, तसेच हा आयोग लागू करून शेतकर्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा, सर्मथन मुल्यात वेळोवेळी गरजेनुसार बदल करून शेतकठयांना स्वावलंबी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा विविध मागण्यांना घेऊन भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश राणे यांनी केले आहे.





