गोंदिया,दि.२7 : भारतीय किसान संघाच्या वतीने शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी २६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ दिवसीय आंदोलन सुरू आहे. शेतकर्यांना स्वामीनाथन आयोगाच्या सिफारशीनुसार आधारभूत मुल्य देण्यात यावे, तसेच हा आयोग लागू करून शेतकर्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा, सर्मथन मुल्यात वेळोवेळी गरजेनुसार बदल करून शेतकठयांना स्वावलंबी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा विविध मागण्यांना घेऊन भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजेश राने यांच्या नेतृत्वात
आंदोलन करण्यात आले.आंदोलनात युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे,डाॅ.प्रशांत कटरे आदींनी भेट दिली. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सहभागी झाले होते.





