गोंदिया,दि.27 : गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभा गुर्जर छत्रीय समाजवाडी रेलटोली गोंदिया येथे २५ ऑगस्ट रोजी शांततेत पार पडली. सभा पतसंस्थेचे अध्यक्ष विरेंद्रकुमार कटरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक पुष्पा अंबुले, देवकी चौधरी, पी. के. पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून सरस्वती, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. संस्थेतर्फे पाल्यांचा स्मृतीचिन्ह, पदक आणि रोख पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. ऑगस्ट २०१८ ते १९ या कालखंडात सेवानिवृ्त झालेल्या संस्था सभासदांची सत्कार करण्यात आला. संस्था अध्यक्षांचे निवेदन झाल्यावर विषय पत्रीकेवर १४ विषयांवर खुली चर्चा करून बहुमताने पारीत करण्यात आले. संस्थाध्यक्षांनी सभासदांच्या प्रश्नांचे ठोक उत्तरे देवून सभासदांचे समाधान केले. सभासदांच्या मागणीनुसार कर्ज मर्यादा १२ वरून १५ लक्ष रुपये करण्यात आली. व्याजदरात १ टक्क्यांनी कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले. डीसीपीएस, एनपीएस धारक सभासदांच्या मृत्यूनंतर ३ लक्ष रुपयांची भरीव मदत देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. एकूण खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. याबद्दल संस्थाध्यक्ष विरेंद्र कटरे, उपाध्यक्ष शंकर नागपुरे, शाखाध्यक्ष योगेश्वर मुंगुलमारे, ओमेश्वरी बिसेन, नागसेन भारेराव, संचालक शंकर चव्हाणष पवन कोहळे, सुमेधा गजभिये, निळकंठ बिसेन, किशोर डोंगरवार, प्रदीप रंगारी, संदीप ति़डके, व्यवस्थापक वासनीक यांनी सभारसांचे आभार मानले.





