वन राज्यमंत्री डॉ परिणय फुकेनी केली गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाची पाहणी

0
19

नागपूर, दि.31 : वन राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाची वन सचिव विकास खारगे यांच्या समवेत आज पाहणी केली.नुकतीच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधीकरण बैठकीत गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला अंतिम मान्यता मिळाली आहे. या पार्श्वभुमीवर संग्रहालयातील विकासकामांची पाहणी वन राज्यमंत्र्यांनी केली. प्राणीसंग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून काही कामे अपूर्ण असून ती लवकर पूर्ण करण्याचे निर्देश श्री. फुके यांनी दिले.
गोरेवाडा प्राणीसंगहालय देशातील मोठे प्राणीसंग्रहालय असेल असे सांगून राज्यमंत्री परिणय फुके म्हणाले की, एकूण 1914 हेक्टर क्षेत्र असलेल्या या प्रकल्पात 539 हेक्टरवर चार प्रकारच्या सफारी होतील. पर्यटकांसाठी हे प्राणीसंग्रहालय आकर्षण असणार आहे. यात जैवउद्यानासह भारतीय सफारी, आफ्रीकन सफारी, रात्र सफारीचे सोयी पर्यटकांना उपलब्ध होतील.
वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 50 हजारांची मदत कोल्हापूर व सांगली जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेकडुन 50 हजारांचा धनाकर्ष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राज्यमंत्री परिणय फुके यांना देण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष के. व्ही. बोलके, एन. आर. गावंडे, एन. एस. भोगे, पी. पखाले उपस्थित होते.