बोगस मजुर दाखवुन लाखो रुपयाचा अपहार

0
34

चान्ना नर्सरीतील प्रकार :सामाजिक वनिकरणाचा कारभार
—————————
अर्जुनी मोर,(संतोष रोकडे),दि.31ः- तालुक्यातील चान्ना /बाकटी येथील विखुरलेल्या सामाजिक स्वरूपात वृक्षलागवड रोपववनात बोगस मजूर हजेरीपटावर दाखवून लाखो रुपयांचा अपहार मागील काही वर्षापासून सुरू असल्याचा आरोप गावातील जागरुक नागरिकांनी केला आहे रोप वनाच्या कामावरील हजेरीपटाची चौकशी करून फक्त पैशाचा अपहार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गावातील 130 नागरिकांनी संबंधित विभाग व ग्रामपंचायतला दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे
चान्ना/बाकटी रोपवनात झालेल्या लाखो रुपयाच्या गैरप्रकारांची लेखी तक्रार या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा करण्यात आली आहे या तक्रारीतून ग्रामपंचायत कार्यालय चान्ना बाकटी च्या वतीने लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अर्जुनी मोरगाव ला सन 2012 मध्ये विखुरलेल्या स्वरूपात वृक्षलागवड रोपवणासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील जाब कार्ड धारक मजुरांकडून रोप वनाची कामे केली जातात वृक्षलागवड करून जोपासना करण्यासाठी जाब कार्ड धारक मजुरांची एका महिन्यासाठी क्रमाक्रमाने गावातील मजुरांची रोप वनात नियुक्ती करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता असे तक्रारकर्त्या ग्रामस्थांनी निवेदनातून म्हटले आहे विखुरलेल्या स्वरूपात वृक्ष लागवड रोप वनात लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण अर्जुनी मोरगाव च्या वतीने सर्व कामे करून हजेरी पटानुसार मजुरी दिली जाते. मागील पाच ते सात वर्षापासून सुरू असलेल्या गैर प्रकाराची माहिती गावातील काही जागरूक नागरिकांना लागताच जाब कार्ड नुसार हजेरीपटाची तपासणी केली असता यातील गैरकारभार पुढे आला त्यात 18 वर्षाखालील शाळाकरी मुले वयोवृद्ध व्यक्ती जी व्यक्ती कधीच कामावर गेले नाही अशा व्यक्तीच्या नावाने हजेरीपट दाखवून लाखो रुपयांची उचल केल्याचे आढळले यात संबंधित विभागाच्या मर्जीने तसेच गावातील संबंधितांच्या सहाय्याने लाखो रुपयाचा घोड केल्याचे बोलल्या जात आहे सदर प्रकरणाची चौकशी करून रोहयो कामावर बोगस मजुरांची नोंद करून लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावण्याची मागणी तक्रारकर्त्या ग्रामवासी यांनी केली आहे
 तीन सप्टेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन
बोगस मजूर दाखवून लाखो रुपयांचा अपहार प्रकरणी चान्ना येथील विखुरलेल्या स्वरूपात वृक्ष लागवड रोप वनातील गैरप्रकारांचा निर्वाळा करण्यासाठी ग्रामपंचायतीने तीन सप्टेंबरला विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे हे सदर प्रकरणात ग्रामपंचायत काय ठोस निर्णय घेते हे याकडे समस्त चान्ना ग्रामवासी यांचे लक्ष लागले आहे