24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय समाधान शिबीर

पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय समाधान शिबीर

0
89
  • सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजन

वाशिम, दि. 0१ : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता वाशिम येथील वाटाणे लॉनमध्ये जिल्हास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.समाधान शिबिरासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये ३१ जुलैपर्यंत नागरिकांच्या समस्या व तक्रारींविषयी निवेदने स्वीकारण्यात आली. या तक्रारी तहसील कार्यालयामार्फत संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्या. त्यावर संबंधित विभागांनी कार्यवाही करून अर्जदारांना त्याबाबत अवगत केले आहे. या कार्यवाहीमुळे समाधान न झालेल्या अर्जदारांच्या तक्रारींवर ३ सप्टेंबर रोजी पालकमंत्री श्री. राठोड यांच्या उपस्थितीत सुनावणी होवून तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे.

या समाधान शिबिराच्या अनुषंगाने दाखल झालेल्या तक्रारींवर शासकीय यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी घेतला आहे. या तक्रारींवर संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच सर्व तक्रारी व त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतचा सुस्पष्ट अहवाल घेवून शासकीय यंत्रणांचे प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांनी समाधान शिबिराला व्यक्तीशः उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

blank