24.7 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ पंचायत समितीसमोर सरंपच सेवा संघाने दिले धरणे आंदोलन

पंचायत समितीसमोर सरंपच सेवा संघाने दिले धरणे आंदोलन

0
42

सडक अर्जुनी,दि.०३ :तालुका सरपंच सेवा संघाच्या वतीने येथील पंचायत समिती कार्यालयासमोर (दि.३)विविध मागण्यांना घेऊन धरणे दिले.हे आंदोलन शासन परिपत्रकामध्ये बदल करुन दारिद्रयरेषेखालील व इतर दाखले देण्याचा अधिकार ग्रामपंचायतस्तरावर देणे, मनरेगा कुशल कामाचे देयके १० दिवसाच्या आत देणे, ५ लाखापर्यंत गाव विकासाची कामे करण्याचे अधिकार सरपंचांना देणे, ग्रामसभेच्या ठरावानुसार अतिगरजू लाभाथ्र्यांना घरकूल देणे,संगणक परिचालकांचे मानधन देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देणे, सरपंचाचे मानधन ५ हजार व उपसरपंचाचे ३ हजार करणे, शौचालय बांधकामाचे पैसे तत्काळ देणे, ग्रामसेवक व संगणक चालक संपावर गेल्यामुळे ग्रामपंचायतीच्या चाब्या सरपंचाच्या स्वाधीन करणे, दाखले देण्याचे अधिकर सरपंचांना देणे आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले.या आंदोलनास मनोहर चंद्रिकापुरे,सरपंच दिनेश कोरे,दिनेश हुकरे,शिवाजी गहाने,पुष्पमाला बडोले,वंदना थोटे,गायत्री इरले,अशोक ठलाल,अनिरुद्ध बांबोडे, विवेक राऊत,नरेश चव्हाण,नाजूक झिंगरे,हेमराज खोटेले,सिंधू बारसागडे आदी सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोंदिया तालुक्यातील सरपंच भेटणार आज जिल्हाधिकाèयांना
गोंदिया तालुक्यातील सरपंच,उपसरपंच संघटना उद्या(दि.४)बुधवारला जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे.त्यात सध्या सुरु असलेल्या ग्रामसेवक,रोजगारसेवक,संगणक परिचालकांचा संप,शासनाच्या आदेशानुसार यावर्षीपासुन अनेक प्रकारचे दाखले  ग्रामपंचायत मार्फत बंद करण्यात आले ते पुर्ववत सुरु करण्याबाबद,सरपंच व उपसरपंचांना सरसकट ५०००रुपये व ३००० रुपये मानधन मिळण्याबाबद,पालकमंत्री पांदण रस्त्यांना मंजुरी देऊन त्वरीत कामे सुरु करणे,ग्रामपंचायत अंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपणाची जवाबदारी ग्रामपंचायत ऐवजी शासनाने सांभाळावे आदी मागण्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे गोंदिया तालुका सरपंच उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष मुनेश रहागंडाले यांनी कळविले आहे.