27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ कोसमटोलाच्या जि.प.प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

कोसमटोलाच्या जि.प.प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

0
40

आमगाव,दि.04ः- वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षी ही सुसरे आळविती।। या  संत तुकाराम महारांजाच्या अभंगाप्रमाणे आज सर्व जीवसृष्टी ही वनांवर अवलंबून आहे.म्हणून वनसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे लक्षात ठेवत आमगाव पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या तिगाव केंद्रातील कोसमटोला शाळेत शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला.
वृक्षरोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णाजी पारधी होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ता व्द्रारपाल बोपचे यांनी वृक्षरोपणाचे महत्व पटवून दिले.आज वन तोडीमुळे जमिनीची धूप होते.पाऊस अनियमित पडत असतो,तापमान जास्त राहत असतो,पुराला आळा बसविता येत नाही.शुद्ध हवा मिळत नाही, करीता वृक्षारोपण व संगोपन करणे ही सर्व नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे.झाडे असली तर आपण राहू असे त्यांनी सांगितले.शाळेच्या परिसरात पेरू,आवळा, हिरडा,अनार,आंबा,गुलमोहर, करंजी,अशोक व बोरीचे झाडे लावण्यात आली.वाढती लोकसंख्या व औद्योगिकीकरणामुळे झाडे फार महत्वाची भूमिका पार पाडतात. कार्यक्रमाला नीलकंठ पारधी,बंटी बोपचे,कुवर रहांगडाले,मोतीलाल बोपचे,वैष्णव बोपचे,रमेश रहांगडाले,अनिल बोपचे,राजू बोपचे,नीलकंठ बोपचे,सुनील रहांगडाले,अजय बोपचे,पंकज रहांगडाले व इतर मंचावर मान्यवर मंडळी उपस्थित होती.संचालन आय.वाय. रहांगडाले यांनी केले.तर आभार श्री पारधी यांनी मानले.